खासदार देलकरांच्या आत्महत्येवरुन CM ठाकरेंचे भाजपला थेट सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२८ फेब्रुवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उपस्थित केले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत बोलतानाच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर आत्महत्येवरुन भाजपला घेरण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

‘देलकर आत्महत्येप्रकरणी देखील बड्या नेत्याचे राजीनामे घेणार का?’

‘पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेतच. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. संजय राठोड यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे. मग मी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेन की, गेल्याच आठवड्यात मुंबईत आणखी एक आत्महत्या झाली आहे. तिच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. जर संजय राठोडबाबत संशय व्यक्त करता म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करता तर या प्रकरणात सुसाइड नोट नाही, कोणाचे आरोप नाही तरी तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करता पण दुसरी जी आत्महत्या खासदार देलकर यांची झाली आहे. त्या आत्महत्येविषयी कुणीच काही बोलत नाही. सात टर्म खासदार राहणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्याविषयी काहीही बोललं जात नाही. पण इथे तर देलकर यांनी १४-१५ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली होती.’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुढे मुख्यमंत्री असंही म्हणाले की, ‘यात अनेक बड्या नेत्यांची आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे आहेत. आता अशावेळी भाजप या बड्या नेत्यांचे राजीनामे घेणार आहेत का? दुर्दैवाने त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं की, इथले मुख्यमंत्री आणि पवार साहेबांवर मला विश्वास आहे. ते मला न्याय देतील. मग यामध्ये ज्या भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची नावं असतील किंवा तेथील कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा परवाना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे का? याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण जसं इथे पूजा चव्हाणने आत्महत्या केली तसं तिथे देलकरांनी आत्महत्या केली. महिला आणि पुरुष हा फरक आहे पण देलकरांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचं कुटुंबीय उघड्यावर आलं. त्यांच्या पत्नी त्या निराधार झाल्या. त्या देखील महिलाच आहेत. त्यांच्यासाठी रस्त्यावर का कोणी उतरत नाही?’

ही बातमी पाहिलीत का?: मुंबईतील हॉटेलात खासदाराचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा अंदाज

ADVERTISEMENT

‘मोहन देलकरांच्या सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची पोलीस चौकशी नक्कीच करेल. पण तो केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे मी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करतो की, आपण तिथल्या प्रशासनाला निर्देश द्यावेत की, मुंबई पोलीस जेव्हा तिथे येईल तेव्हा त्यांनी सहकार्य करावं.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आता याप्रकरणी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने संजय राठोड यांच्या माध्यमातून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलेला असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देलकर यांच्या आत्महत्येवरुन भाजपवर प्रतिहल्ला केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक गाजण्याची शक्यता आहे. अशावेळी आता भाजप देलकर यांच्या प्रकरणी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT