उद्धव ठाकरे कोरोना काळात मान खाली घालून पैसे मोजत होते – सोमय्यांची बोचरी टीका

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सर्व्हायकल स्पाईन आजारामुळे त्रस्त होते. परंतू यानंतरही राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत, कोरोना काळात मुख्यमंत्री मान खाली घालून पैसे मोजण्यात व्यस्त होते असं म्हटलं आहे. काही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सर्व्हायकल स्पाईन आजारामुळे त्रस्त होते. परंतू यानंतरही राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत, कोरोना काळात मुख्यमंत्री मान खाली घालून पैसे मोजण्यात व्यस्त होते असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मानेच्या दुखण्यामुळे पट्टा लावून बसलेल्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोरोनाच्या संपूर्ण काळात आपल्याला वर मान करायलाही वेळ मिळाला नाही एवढे काम होते, आणि त्यामुळेच मानेचा त्रास सुरू झाला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे काम करण्यात नव्हे तर कोरोनाकाळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर असलेले बंगले वाचवण्यात व्यस्त होते, अनिल परब यांना मदत करण्यात व्यस्त होते.”

सोबतच आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यामुळे महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच नव्हे तर देशातील जनता देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. भारतीय जनतेला हिंदुत्वाचा अभिमान असल्याने ते उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी होण्याची देवाकडे प्रार्थना करत आहेत, भलेही ते हिरवेधारी झाले असले तरी…असा चिमटाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना घेतला आहे.

सोनिया गांधींसमोर वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लागला – नितेश राणेंची बोचरी टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp