कल्याण : मंदिरातली दानपेटी हलवल्याचा संशयावरुन वृद्ध महिलेला शिवीगाळ आणि मारहाण

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, कल्याणच्या जोशी बाग परिसरातील घटना
कल्याण : मंदिरातली दानपेटी हलवल्याचा संशयावरुन वृद्ध महिलेला शिवीगाळ आणि मारहाण
फोटो प्रातिनिधीक आहे

मंदिराची दानपेटी हलवल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने वृद्ध महिलेला मारहाण करत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने सदर महिलेला सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केली, हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण पश्चिमेकडील जोशीबाग परिसरात ही घटना घडली असून आरोपी सुरज मिरजकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडील जोशी बाग परिसरात सुरज मिरजकर आणि 60 वर्षीय वृद्ध महिला गीता उतेकर राहतात. शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास  सुरेंद्र मिरजकर याने घराशेजारी असलेल्या मंदिरातील दानपेटी हलवल्याच्या संशयातून गीता याना शिवीगाळ केली.

यादरम्यान गीता यांनीही सूरजला आक्रमकपणे जाब विचारला असता सुरजने गीता यांच्या डोक्यात सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केली .  या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सध्या वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.