Mumbai Bank Election: भाजपच्या प्रविण दरेकरांना सहकार विभागाकडून नोटीस, नेमकं प्रकरण काय?
मुंबई: मुंबई बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना यांना सहकार विभागाने नोटीस बजावल्याचं समोर आलं आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेच्या अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर सहकार विभागाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना यांना सहकार विभागाने नोटीस बजावल्याचं समोर आलं आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेच्या अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर सहकार विभागाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आधीही मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुंबई बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.
प्रविण दरेकर यांना सहकार विभागाने जी नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांना आपण मजूर आहात की नाही? असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. यावेळी त प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे.
2 जानेवारी 2022 रोजी मुंबई बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्यासारखी मातब्बर मंडळी या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या तरी दरेकर आणि लाड यांच्याविरोधात कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. तरी दरेकरांना मिळालेली नोटीस ही त्यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते.