धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर

मुंबई तक

एकीकडे राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. राज्य सरकार कठोर पावलं उचलताना दिसतं आहे. अशात पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियम थेट धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसून आलं. एक हजाराहून जास्त लोक या लग्नात सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. राज्य सरकार कठोर पावलं उचलताना दिसतं आहे. अशात पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियम थेट धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसून आलं. एक हजाराहून जास्त लोक या लग्नात सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यानंतर सामान्यांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना एक न्याय असं का? असाही प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

माजी खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांचा विवाह सोहळा पुण्यात पार पडला. या लग्नासाठी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मात्र या लग्नात कोरोना नियम कुठेही पाळले गेल्याचं दिसलं नाही. वधू वरांना स्टेजवर भेटायला जात असतानाही अनेकांनी मास्क घातला नसल्याचं दिसून आलं. तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नाही. काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात कालपासूनच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp