कोरोना फोफावतोय! महाराष्ट्र ‘टास्क फोर्स’ने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीनंतर टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे काही सूचना केल्या आहेत. दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता […]
ADVERTISEMENT

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीनंतर टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे काही सूचना केल्या आहेत.
दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी टास्क फोर्स सदस्यांनी त्यांची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानी घातली. मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. मंगळवारी या टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या सूचना सांगितल्या. डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी तसेच इतर सदस्य बैठकीत होते.
Booster dose : तुम्हीही बुस्टर डोस घ्यायला टाळाटाळ करताय?, मग ही माहिती वाचा
पुन्हा एकदा मास्क सक्ती?