मुंबईहून गोव्यात गेलेल्या क्रूझमधील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मज्जाव

Mumbai-Goa cruise Corona Cases: मुंबई-गोवा क्रूझमधील तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.
covid test of 2 thousand passengers in the cruise that reached goa from mumbai 66 people found infected
covid test of 2 thousand passengers in the cruise that reached goa from mumbai 66 people found infected(प्रातिनिधिक फोटो)

पणजी: मुंबईहून गोव्याला आलेल्या क्रूझमधील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रूझमधील तब्बल 66 प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे गोव्यातील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही क्रूझ मुंबईहून गोव्यात पोहोचली होती.

क्रूझमधील एक क्रू-मेंबर हा कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला. ज्यानंतर या जहाजातील 2000 हून अधिक प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. यासोबतच कोणीही कोरोना टेस्ट झाल्याशिवाय क्रूझमधून बाहेर पडू नये. अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या.

याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) संबंधित जिल्हाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळवण्यात आल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. आता सरकार प्रवाशांना क्रूझमधून उतरण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्रूझ गोव्यात पोहोचलं तेव्हा सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पीपीई किटमध्ये टीम पाठवण्यात आल्या होत्या. टीमने 2016 च्या प्रवाशांचे आरटी-पीसीआर नमुने घेतले, ज्यामध्ये तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, 'आम्ही क्रूझच्या ऑपरेटरला सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते, त्यासोबतच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्रूझमधून उतरू दिले जाणार नाही. असेही स्पष्ट संकेत दिले होते. सध्या, क्रूझ मोरमुगाओ बंदर क्रूझ टर्मिनलजवळ आहे. कारण MPT ने क्रूझला गोव्यात डॉक करण्यास परवानगी दिलेली नाही.

क्रूझमध्ये 66 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आणि कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत क्रूझचे सेलिंग (प्रवास) 3 आणि 5 जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत क्रूझच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनेच

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे मुंबईत्या वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनेच चालली आहे हे समोर येतं आहे. मुंबईत दिवसभरात 10 हजार 680 नवे रूग्ण दिवसभरात आढळले आहेत.

तर दिवसभरात 654 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 वरून 92 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 47 हजार 476 सक्रिय रूग्ण आहेत. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीतला रूग्ण वाढीचा दर अर्थात ग्रोथ रेट हा 0.63 टक्के इतका आहे.

covid test of 2 thousand passengers in the cruise that reached goa from mumbai 66 people found infected
महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका

21 डिसेंबरला 327 रूग्ण मुंबईत होते मात्र आता ती संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची आणि काळजीची बाब आहे. मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांमुळे शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in