अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या गाडीला भीषण अपघात, एअर बॅगमुळे थोडक्यात बचावले!

Ajit Pawar trusted colleague Kiran Gujar car accident: अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्या कारला जेजुरी येथे भीषण अपघात झाला आहे.
अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या गाडीला भीषण अपघात, एअर बॅगमुळे थोडक्यात बचावले!
deputy chief minister ajit pawar trusted colleague kiran gujar car accident

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीला जेजुरीजवळ भीषण अपघात झाला. सुदैवाने अपघातानंतर गाडीच्या एअर बॅग उघडल्याने गुजर यांना दुखापत झाली नाही.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीसाठी किरण गुजर आज पुण्याला गेले होते. काम आटोपून परत येत असताना जेजुरीजवळ समोर चालणाऱ्या एका गाडीला शाळकरी मुले आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला.

त्यामुळे गुजर यांच्या इनोव्हा गाडीने वाहनाला मागून धडक दिली. जोरदार धडक दिल्यामुळे गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या त्यामुळे सुदैवाने गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, किरण गुजर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. अजित पवार यांच्या वेगवेगळ्या निवडणुका आणि त्याची रणनीती आखण्याची महत्वपूर्ण जबाबदारी गुजर पार पाडत असतात. त्यामुळे अपघाताच्या बातमीनंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

खुद्द अजित पवार यांनी देखील तातडीने किरण गुजर यांच्याशी संपर्क साधत त्यांची विचारपूस केली. अपघातात आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन किरण गुजर यांनी केले आहे.

deputy chief minister ajit pawar trusted colleague kiran gujar car accident
बारामती गोळीबारप्रकरणी दोन आरोपींना अवघ्या काही तासात अटक

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर बारामतीत गोळीबार

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका निकटवर्तीयावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामुळे अवघ्या बारामतीत एकाच भीतीचं वातावरण पसरलं होतं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रविराज तावरे यांच्यावर दोन गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या होत्या. त्यापैकी रविराज यांना एक गोळी लागली होते. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

माळेगावच्या संभाजी नगर भागात रविराज आपली पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह बाहेर आलेले असताना अचानक साखर कारखान्याच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट गाडीवरील दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या होत्या. ज्यामध्ये रविराज गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं.

जखमी झाल्यानंतर देखील रविराज आपल्या कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. पण गोळी त्यांच्या खांद्याला लागली होती त्यामुळे त्यांना कार चालवता येत नव्हती. दरम्यान, गोळ्यांचा आवाज ऐकताच जवळपास असणाऱ्या अनेकांनी रविराज यांच्या दिशेने धाव घेत त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केलं होतं.

Related Stories

No stories found.