प्रियंका चर्तुर्वेदी-अमृता फडवणीसांमध्ये घमासान; ‘मॅडम चतूर… औकात… अन्’
Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi Twitte Fight : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनिक्षा नावाच्या डिझायनरने 1 कोटीची ऑफर देऊन पैसे कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हे प्रकरण जास्त अंगलट आल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाची […]
ADVERTISEMENT

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi Twitte Fight : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनिक्षा नावाच्या डिझायनरने 1 कोटीची ऑफर देऊन पैसे कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हे प्रकरण जास्त अंगलट आल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आरोप केले होते. या दरम्यान प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीसांमध्ये ट्विटरवर शाब्दीक वार रंगला होता.(designer aniksha 1 crore bribe case amruta fadnavis and mp priyanka chaturvedi twitter war)
खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संबंधित या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका गुन्हेगाराच्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी 5 वर्षाहून अधिक काळ मैत्री होते. तसेच प्रमोशनच्या नावाखाली बायकोला दागिने, घालायला कपडे, तिच्याच गाडीत तिच्यासोबत हिंडायला मिळते, असे फडणवीसांचे विधानसभेतील तंतोतंत विधान चर्तुर्वेदी सुरुवातीला ट्विटमध्ये मांडले.
अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा, प्रकरण काय?
डिझायनर मैत्रिण बुकींची तक्रार करून, छापा टाकत त्यांच्याकडून पैसे कमवू अशी डिल करते. तरीही त्यांची मैत्री कायम राहते, या गोष्टीकडे प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) लक्ष वेधले. आता या प्रकरणात व्हिडिओ आणि ब्लॅकमेलचे आरोप होतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा सवाल चुर्तुवेदी यांनी यावेळी उपस्थित केला.
A criminal’s daughter gains access to de facto CM’s house&is friends with his wife for over 5 years (as per DCM statement in assembly). Gives his wife jewellery, clothes to wear (for promotion). Roams around with her in her car. 1/ pic.twitter.com/6CyYKHpZsE
— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) March 16, 2023
फडणवीसंच गृहमंत्री अन् म्हणतात राजकिय षडयंत्र
राज्यात पोलीस कोणाकडे तक्रार करतात? गृहमंत्री, होम मिनिस्टर कोण आहे? देवेंद्र फडणवीस, तक्रार करणाऱ्या कोण? अमृता फडणवीस, आणि फडणवीस म्हणतात हे राजकिय षड़यंत्र आहे,अशी टीका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केली. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला नको का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आणि व्हिडीओमध्ये त्यांच्याच कुटुंबाच्या मुद्द्यावर फेरफार केल्याचा दावा करणारे गृहमंत्र्यांचे हे विधान चुकीचे आणि अनैतिक आहे, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.जर हे प्रकरण विरोधी पक्ष नेत्यासोबत घडले असेत तर उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप, मीडियाचा आक्रोश, ईडीची उडी,सीबीआय दाखल, एसआयटी गठित करत आरडाओरड केली असती, अशी टीका देखील चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केली.
सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण
Madam चतुर-earlier you falsely claimed that I brought benefits to AxisBank & now you are challenging my honesty?
Of course-after gaining ur confidence,if someone-had approached you to close cases by offering money-you would have helped such person thru ur master-that’s your औक़ात https://t.co/mQVDUJBtO2— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 16, 2023
अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर
प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi)यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. प्रियंका चर्तुर्वेदी यांचा ‘चतूर’ असा उल्लेख करत, आधी तुम्ही खोटा दावा केला होता की मी अॅक्सिस बॅंकला फायदे आणले आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणालाच आव्हान देत आहात? असा सवाल त्यांना केला. आणि जर कोणी तुमचा विश्वास जिंकल्यावर, पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता, तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती. हीच तुमची औकात आहे, अशी टीका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केली. या त्यांच्या टीकनेंतर शाब्दीक वाद रंगलाय.
Amruta Fadnavis यांना 1 कोटी लाचेची ऑफर देणारी ‘ती’ तरुणी कोण?