‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत चढला पारा

मुंबई तक

Devendra fadnavis in maharashtra budget session : अवकाळी पावसामुळे (unseasonal rain in maharashtra) राज्यातील अनेक भागांत शेतमाल आणि फळपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले. यावर सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवेदन केलं. निवेदन करत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे फडणवीसांचा पारा चांगलाच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Devendra fadnavis in maharashtra budget session : अवकाळी पावसामुळे (unseasonal rain in maharashtra) राज्यातील अनेक भागांत शेतमाल आणि फळपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले. यावर सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवेदन केलं. निवेदन करत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे फडणवीसांचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळालं. (Devendra Fadnavis Gets Angry after opposition leaders raised unseasonal rain issue)

कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसानीचा मुद्दा मांडला.

अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?

“अवकाळी पाऊस पडेल, गारपीट होईल याबद्दल हवामान विभागाने पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर केले होते. कुठल्या भागात होणार याबद्दलही अंदाज वर्तवण्यात आले होते. पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्षे, संत्रा, आंब्याचा मोहोर, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे. मेंढ्यासह शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांवर झोपून शेतकरी स्वतःचं तोंड झोडून घेतोय. हातातोंडाशी आलेली पिकं गेली. सरकार तातडीने काय मदत करणार आहे? केंद्रातील पथकं तातडीने बोलवणार आहेत का?”, असे प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर स्थगन प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर निर्णय देऊन त्यावेळी बोलण्याची संधी देईन, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

Maharashtra budget Session Live: उद्धव ठाकरे आज अधिवेशनात, मविआची बैठक

हे वाचलं का?

    follow whatsapp