Shiv Sena Bhavan: ‘आम्ही तोडफोड करत नाही, ती आमची संस्कृती नाही’, फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

भाजपचे (BJP) विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडण्याचं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे अनेक नेते आता भाजपवर निशाणा साधत आहेत. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असं म्हटलं आहे की, ‘तोडफोड करणं आमची संस्कृती नाही.. आम्ही तोडफोड करत नाही.’ त्यामुळे फडणवीसांकडून या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारणा केली असताना त्यांनी असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘तोडफोड करणं ही आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हीडिओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

नेमका वाद काय?

ADVERTISEMENT

मुंबईतील माहीम येथील भाजपच्या एका कार्यालयाचं उद्घाटनसमयी बोलताना प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

‘भाजपची ताकद काय आहे हे २०१४ विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे.’

‘यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु’, असं लाड म्हणाले होते.

दरम्यान, यानंतर त्यांनी याप्रकरणी दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र, असं करताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत मीडियावर सगळं खापर फोडलं.

संजय राऊतांची बोचरी टीका

प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

Prasad Lad: ‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस सेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपतील,’ राऊतांची प्रसाद लाडांवर बोचरी टीका

‘महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. ( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?’ अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT