राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची फिल्डिंग...

शिवसेनेचा पराभूत उमेदवार भाजपमध्ये
DCM Devendra Fadnavis
DCM Devendra FadnavisMumbai Tak

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या 'कराड उत्तर' मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे. याचाच एक भाग म्हणून कऱ्हाड उत्तरमधील शिवसेनेचे नेते धैर्यशील कदम यांनी काल मुंबईत शिवबंधन तोडून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम हेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

धैर्यशील कदम हे कराड उत्तर मतदारसंघातील मोठे नाव समजले जाते. यापूर्वी 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. 2014 साली कदम यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी दोन नंबरची मत घेवून पाटील यांना विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लावला होता. तर २०१९ मध्ये कदम यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. त्यावेळी मात्र त्यांच्या मतांमध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

DCM Devendra Fadnavis
BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय : 'राज्यकर्ता' ठरवणार मनसेची व्यूहरचना

पुढे राजकीय उलथापलथ होवून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकासकामांना निधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना निधी दिला नाही. विकासकामांच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या, असा दावा अनेकदा त्यांनी केला होता. ही कोंडी फोडण्यासाठी कदम यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांना भेटून आपली खदखद मांडली होती.

DCM Devendra Fadnavis
राजकारणातील मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती, निवडणुका एकत्र लढणार

अखेरीस आता राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी अखेर मुंबई येथे भाजप कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in