जिल्हा परिषद शाळेत शिक्षण, बेताची आर्थिक परिस्थिती; बीडच्या युवकाची पीएचडीसाठी सातासमुद्रापार झेप
– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी अनेकदा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शहरात किंवा ग्रामीण भागात पालक चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिवाचा आटापीटा करण्याचा प्रयत्न करतात. परंतू विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड असेल तर ते जगाच्या कोणत्याही शाळेत चांगला अभ्यास करुन आपलं नाव मोठं करतात. बीडच्या दिलीप वामन शिनगारेनेही हेच उदाहरण एकदम तंतोतंत खरं ठरवून दाखवलं […]
ADVERTISEMENT

– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी
अनेकदा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शहरात किंवा ग्रामीण भागात पालक चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिवाचा आटापीटा करण्याचा प्रयत्न करतात. परंतू विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड असेल तर ते जगाच्या कोणत्याही शाळेत चांगला अभ्यास करुन आपलं नाव मोठं करतात. बीडच्या दिलीप वामन शिनगारेनेही हेच उदाहरण एकदम तंतोतंत खरं ठरवून दाखवलं आहे.
बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील आरणवाडी या डोंगराळ गावात राहणारा दिलीप आता पीएचडीसाठी थेट सातासमुद्रापार आयर्लंडला जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या दिलीपचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आहे.
दिलीपच्या घरात आर्थिक परिस्थिती बेताची, परंतू शिक्षणासाठी दिलीपच्या वडिलांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून दिलीपचं शिक्षण पूर्ण केलं. आता वडिलांचा हाच भार दिलीप आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचं संशोधन करुन हलका करणार आहे. दिलीपनेही हालाकीच्या परिस्थितीवर मात करत औषधनिर्माण शास्त्रात बी.फार्म, एम.फार्म पूर्ण केलं. यानंतर दिलीपची मायक्रोबायलॉजी आणि मोल्युक्युलर बायलॉजी या विषयात पीएचडीचे संशोधनासाठी आयर्लंडच्या गॅलवे येथील नॅशनल युनिव्हर्सिटीसाठी निवड झाली आहे.