पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचे 'ते' पत्र... तब्बल 15 वर्षांनंतर पतीने उडवून दिली खळबळ!

मुंबई तक

पोलिसांना एका घरात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला आणि त्याच्या शेजारी एक सुसाईड नोट सुद्धा आढळली. ज्यात, पत्नीच्या मृत्यूनंतर आत्महत्या करत असल्याचं महिलेच्या पतीने लिहिलं होतं. पण आता, 15 वर्षांनंतर, तरुणीचा मृत पती जिवंत सापडला असल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.

ADVERTISEMENT

 तब्बल 15 वर्षांनंतर पती जिवंत आढळला अन्...
तब्बल 15 वर्षांनंतर पती जिवंत आढळला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या मृत्यूनंतर आत्महत्या करत असल्याची नोट...

point

तब्बल 15 वर्षांनंतर जिवंत आढळला!

point

पतीने आपल्या पत्नीसोबत असं का केलं?

Crime News: दिल्लीच्या जहांगीरपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. एका तरुणीचा भयानक पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना एका घरात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला आणि त्याच्या शेजारी एक सुसाईड नोट सुद्धा आढळली. त्यात लिहिलं होतं, "मी, नरोत्तम प्रसाद, माझ्या 25 वर्षीय पत्नी रीटाच्या मृत्यूमुळे दुःखी आहे आणि नदीत उडी मारून आत्महत्या करत आहे." त्यानंतर, मृतदेहाची तपासणी झाली आणि संबंधित महिलेवर क्रूरपणे हल्ला झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांना पीडितेला मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आला. त्यानंतर, पोलिसांनी नदीजवळ नरोत्तमचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी काहीच आढळलं नाही. अखेर हे प्रकरण थोडं थंड झालं. पण आता, 15 वर्षांनंतर, तरुणीचा मृत पती जिवंत सापडला असल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. 

स्वतःला वाचवण्यासाठी आत्महत्येचं नाटक...

संबंधित प्रकरण हे 2010 सालातील आहे. नरोत्तम प्रसाद नावाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तो फरार झाला. पत्नीच्या हत्येनंतर, त्याने स्वतःला वाचवण्यासाठी एक बनावट सुसाईड नोट लिहिली, त्यामध्ये त्याने लिहिलं की तो नदीत उडी मारून आत्महत्या करत आहे. त्यावेळी, पोलिसांना घरात रीटाचा कुजलेला मृतदेह सापडला. मृत महिलेच्या शरीरावर बऱ्याच जखमा होत्या. नरोत्तम पत्नीच्या हत्येनंतर अचानक गायब झाला, त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे, पोलिसांनी नदीत सुद्धा शोध घेतला पण तपासात एकही मृतदेह आढळला नाही. या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल झाला, आज घटनेच्या 15 वर्षांनंतर, प्रकरणातील आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा: ठाणे: विवाहबाह्य संबंधाचं आणखी एक भयानक प्रकरण! पतीची निर्घृण हत्या अन् उल्हास नदीत मृतदेह फेकला...

वेगवेगळ्या शहरात खरी ओळख लपवून राहिला 

तब्बल पंधरा वर्षांनंतर, आरोपी नरोत्तम गुजरातमधील एका छोट्या शहरात फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम करताना आढळला. आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर, तो एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत राहिला, त्या काळात त्याने बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केला आणि प्रत्येक ठिकाणी आपली वेगवेगळी ओळख सांगून तो तिथे राहत होता.  परंतु, 15 वर्षांनंतर, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला अखेर एक यश मिळाले. गुप्तचर माहितीनुसार नरोत्तम गुजरातमध्ये लपून बसल्याचं आढळून आलं. त्यानंतर दिल्ली गुन्हे शाखेने छापा टाकून त्याला छोटा उदयपूर येथे अटक केली.

हे ही वाचा: बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार उमेदवार असतील का? अजित पवारांनी रणनिती सांगितली

घरगुती वादातून मोठा गुन्हा 

पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, "घरगुती वादातून रागाच्या भरात प्रसादने त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर, त्याने आत्महत्या करत असल्याचं नाटक केलं आणि पत्नीच्या हत्येनंतर तो 15 वर्षे वेगवेगळ्या शहरांमध्ये आपली खरी ओळख लपवून राहू लागला. पोलिसांनी आता आरोपी पतीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं आणि त्याची रिमांड मागितली. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, "नरोत्तम एमबीए उत्तीर्ण आहे, पण घरगुती वादातून त्याने हा गुन्हा केला." पोलिस आता त्याच्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी करत आहेत. प्रसादवर आयपीसीच्या कलम 302 (खून) आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp