बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार उमेदवार असतील का? अजित पवारांनी रणनिती सांगितली

मुंबई तक

Ajit Pawar on Jai Pawar : बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांना उमेदवारी दिली जाईल का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ADVERTISEMENT

 Ajit Pawar on Jai Pawar
Ajit Pawar on Jai Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार उमेदवार असतील का?

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रणनिती सांगितली

Ajit Pawar on Jai Pawar, बारामती : राज्य निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामती नगराध्यक्षपदाच्या हायहोल्टेज निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जय पवार हे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ठरवण्यासाठी मी मुलाखती घेणार आहे. जय पवारांच्या उमेदवारीबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत. मात्र, जय पवार हे उमेदवार नसतील, हे स्पष्ट करतोय.

हेही वाचा : नितीन गडकरींसमोर खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन

अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातील सहकारी मित्रांशी बोलून मी निवडणुकीचा आढावा घेतला. बारामतीमध्ये मी चाचपणी केली. नगरपालिका पूर्वी आघाडी करुन लढली जायची. स्वर्गीय कारभारी आण्णा असताना आणि गुजर साहेब असाताना देखील त्यांचे पॅनेल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची. जे येतील ते पवार साहेबांचे असतील, असं त्यावेळी सूत्र होतं. ज्यावेळी बारामतीकरांनी 1991 साली खासदार केल्यानंतर मी ठरवलं की पक्षाच्या नावावर निवडणूक लढवायची. आघाडी केल्यास व्हिप बजावता येत नाही. मर्यादा पडतात. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यास पक्षविरोधी काम केल्यास कारवाई करता येते. त्यामुळे मी त्यानंतर पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा निर्णय घेतला. बारामतीकरांनी मला नेहमीच साथ दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp