भारताच्या अर्थव्यवस्थेत ‘डबल A व्हेरिएंट’ पसरतोय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण सत्यापासून दूर आहे, त्यात बेरोजगारीचा उल्लेखही नाही. तर गेल्या वर्षी 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या 50 वर्षांत भारतातील ही सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण सत्यापासून दूर आहे, त्यात बेरोजगारीचा उल्लेखही नाही. तर गेल्या वर्षी 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या 50 वर्षांत भारतातील ही सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी यांनी उद्योगपती अंबानी आणि अदानी यांनाही यावेळी लक्ष्य केले. राहुल यांनी या दोन उद्योगपतींना ‘डबल ए’ व्हेरिएंट (Double A Variant) असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी राहुल गांधींनी दोन उद्योगपतींचा (मुकेश अंबानी आणि गौतम अदानी) उल्लेख केला. ते म्हणाले, ‘कोरोनाचे अनेक व्हेरिएंट येत आहेत. पण देशाच्या अर्थव्यवस्थेत ‘डबल ए’ व्हेरिएंट वाढत आहे.’
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘एक व्यक्ती (मी नाव घेणार नाही) देशातील सर्व बंदरे, विमानतळ, वीज पारेषण, खाणकाम, हरित ऊर्जा, गॅस वितरण, खाद्यतेल… भारतात जे काही घडते, तिथे अदानीजी दिसतात. दुसरी बाजू पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम, रिटेल, ई-कॉमर्समध्ये अंबानींची मक्तेदारी आहे. त्यामुळे संपूर्ण पैसा हा काही निवडक लोकांच्याच हातात जात आहे.’ असं म्हणत राहुल गांधींनी अदानी-अंबानींवर निशाणा साधला.