Indonesia earthquake : इंडोनेशिया भूकंपाच्या धक्क्याने हादरला! 162 ठार, शेकडो जखमी

मुंबई तक

इंडोनेशियाची राजधानी जकार्तात भूकंपाच्या झटक्यामुळे विध्वंस झाला. बहुमजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. भूकंपाच्या घटनेत मोठी जीवितहानी झाली असून, 162 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रती 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. इंडोनेशियात झालेल्या भूकंपामुळे जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली लोक दबले गेलेले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

इंडोनेशियाची राजधानी जकार्तात भूकंपाच्या झटक्यामुळे विध्वंस झाला. बहुमजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. भूकंपाच्या घटनेत मोठी जीवितहानी झाली असून, 162 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रती 5.6 रिश्टर स्केल इतकी होती.

इंडोनेशियात झालेल्या भूकंपामुळे जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली लोक दबले गेलेले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय.

भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रातांतील डोंगराळ भागात असलेल्या सियानजुर शहराजवळ होता. सोमवारी दुपारी भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर लोक घाबरले आणि घरांमधून बाहेर पडले.

भूकंपाची तीव्रता जास्त असल्यानं अनेक मोठ्या इमारती कोसळल्या. या दुर्घटनेत जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, जखमींचा आकडाही मोठा आहे. सियानजुर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये जखमींवर उपचार केले जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp