शिवसेनेच्या आणखी सहा नेत्यांचे घोटाळे समोर येणार; सोमय्यांकडून ठाकरेंची कोंडी

मुंबई तक

श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावे असलेल्या कंपनीचा उल्लेख करत सोमय्यांनी शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, “माझा प्रश्न आहे की, निलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि., […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावे असलेल्या कंपनीचा उल्लेख करत सोमय्यांनी शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, “माझा प्रश्न आहे की, निलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि., श्रीधर माधवराव पाटणकर ऊर्फ उद्धव ठाकरे यांचे मेहुणे म्हणजेच रश्मी उद्धव ठाकरे यांचे भाऊ. पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, पुष्पक रिअॅलिटी डेव्हलपर्स, नंदकिशोर चतुर्वेदी म्हणजे हवाला डीलर… उदाहरण म्हणून मी एका शेल कंपनीचं नाव दिलं आहे.”

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला

“आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये जी ही कंपनी बनवली होती. आदित्य ठाकरे या कंपनीत संचालक, मालक आणि ५० टक्के त्यांचा हिस्सा, तर ५० हिस्सा रश्मी उद्धव ठाकरे यांचा. आता या कंपनीची काय अवस्था आहे. ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. हा नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आहे. ३० कोटींच्या व्यवहारात हेच महाशय सहभागी आहेत,” अशी सोमय्या म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp