नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला

काय म्हणाले राणे पितापुत्र? : "बाळासाहेबांनी मनोहर जोशींना राजीनामा द्यायला सांगितलं होतं, तोच नियम इथे लागू होणार का?"
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या स्थावर संपत्तीवर ईडीने तात्पुरत्या स्वरुपात टाच आणली. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातलगावरच कारवाई झाल्यानं राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या कारवाईनंतर आता राणे पित्रापुत्रांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विट करत हल्ला चढवला आहे. दुसरीकडे मनसेनंही या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुढे काय होतंय ते बघा, असं म्हणत गर्भित इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना राजीनामा द्यायला सांगितल्याच्या घटनेचा दाखला देत तोच नियम आता लागू होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर ED च्या कारवाईचं नेमकं प्रकरण तरी काय?

नारायण राणे काय म्हणाले?

श्रीधर पाटणकर यांच्या कारवाईनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. "महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचं शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!", असा प्रहार राणेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला
श्रीधर पाटणकरांवर ईडीची कारवाई; राऊत म्हणाले, 'आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार'

नितेश राणेंनी काय दिला इतिहासाचा दाखला?

"इतिहास सांगतो... जावयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितलं होतं. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग तोच नियम आता इथेसुद्धा लागू होणार की, शिवसैनिकांसाठी वेगळे नियम आहेत?" असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे.

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला
'ईडी'ची छापेमारी वाढली! यूपीए सरकारच्या काळात ११२, तर मोदी सरकारच्या काळत २,९७४ धाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही काढला चिमटा

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची स्थावर मालमत्ता जप्त केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही चिमटा काढला आहे. संदीप देशपांडेंनी दुनियादारी सिनेमातील 'मेहुणे मेहुणे मेहुण्याचे पाहुणे' या संवादाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर 'पाहुणे आले घरापर्यंत', असं म्हणत देशपांडेंनी टोला लगावला आहे.

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला
ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती जप्त; 'मुख्यमंत्र्यांनी वेळ वाया न घालवता पदाचा राजीनामा द्यावा'

"त्रास देण्यासाठीच हा कार्यक्रम हाती घेतलाय"

"या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशासमोरील महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही दिलेली आकडेवारी खरी असेल, तर ती स्वच्छ सांगते. याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे ५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहे का, पण त्यावर आता चर्चा न केलेली बरी", अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईवर मांडलेली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in