औरंगाबादमध्ये महाराष्ट्र सहकारी बँक प्रकरणी ईडीचे छापे, शिवसेना नेते अर्जुन खोतकर रडारवर!

मुंबई तक

औरंगाबाद शहर आणि इतर जवळच्या भागांमध्ये महाराष्ट्र बँक प्रकरणी ईडीने छापे मारले आहेत. आता यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे ईडीच्या रडारवर आहेत हे दिसून येतं आहे. अर्जुन खोतकर हे माजी मंत्री आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून हे छापासत्र सुरू आहे. जालना या ठिकाणी अर्जुन खोतकर यांच्या घरीही छापा मारण्यात आला आहे. तसंच जालन्यातील कृषी उत्पन्न […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद शहर आणि इतर जवळच्या भागांमध्ये महाराष्ट्र बँक प्रकरणी ईडीने छापे मारले आहेत. आता यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे ईडीच्या रडारवर आहेत हे दिसून येतं आहे. अर्जुन खोतकर हे माजी मंत्री आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून हे छापासत्र सुरू आहे. जालना या ठिकाणी अर्जुन खोतकर यांच्या घरीही छापा मारण्यात आला आहे. तसंच जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवरही छापे मारण्यात आले आहेत. किरीट सोमय्यांनी या प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले होते.

किरीट सोमय्या ‘जरंडेश्वर’ बघायला गेले आणि राडा झाला…| Ajit Pawar

किरीट सोमय्या यांचे काय होते आरोप?

जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्या आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली. 2012 मध्ये टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू 70 कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट आणि मशनरी प्राईस फक्त 42 कोटी ठेवण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp