ईव्हिएमसोबतच मतपत्रिकेचाही पर्याय मतदात्यांना मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मतदात्यांना ईव्हिएम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबरोबरच मतपत्रिकांचाही पर्याय मतदानावेळी असावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कायदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुच्छेद 328 नुसार विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार अनुषंगिक कायदा तयार करून ईव्हिएमव्यतिरिक्त मतपत्रिकेने जनतेला मतदानाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे नागरिक आपल्या इच्छेनुसार मतदानावेळी ईव्हिएम किंवा मतपत्रिकांचा वापर करू शकतील.

नागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन तसंच याचिका सादर केली होती. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबई येथील विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अर्जदार उके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलेलं की, जनतेकडे मतदानावेळी ईव्हिएम मशीन बरोबरच मतपत्रिकांचाही पर्याय असायला हवा, तो त्यांचा अधिकार आहे. काय अधिक विश्वासार्ह आहे हे जनतेला ठरवू द्या, असंही ते म्हणाले. ईव्हिएम कार्यप्रणालीसंदर्भात साशंकता आहे. अशात नागरिकांना पारंपारिक पद्धतीने मतदान करायचे असल्यास, तशी सुविधा त्यांच्याकडे असायला हवी, असं मत या क्षेत्रातील तज्ञांनीही व्यक्त केलंय. त्यामुळे राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत कायदा करण्याच्या अधिकाराचा वापर करून हा अधिकार जनतेला मिळवून देता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

यासंदर्भात पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे व्हिडिओ देखील पहा..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT