Shah Rukh Khan Son: EXCLUSIVE: NCB चे अधिकारी अचानक आर्यन खान समोर आले, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधील ड्रग्स पार्टीवर छापा मारल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर आरोपींना अटक केली. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची कोठडीही सुनावली होती.

खरं तर, छाप्यापूर्वी, एनसीबीला पक्की माहिती मिळाली होती की क्रूझवर ड्रग पार्टी होणार आहे. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी जहाजाची तिकिटे खरेदी केली आणि जेव्हा क्रूझचा प्रवास सुरु झाला तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारुन आरोपींना अटक केली.

आर्यन खान नेमका कसा सापडला NCB च्या अधिकाऱ्यांना?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एनसीबीच्या सूत्रांनी इंडिया टुडेला अशी माहिती दिली की, क्रूझवर तब्बल 1300 ते 1400 लोक उपस्थित होते, परंतु एनसीबीला मिळालेल्या टीपनुसार त्यांना त्यातील 8 ते 10 लोकांना शोधायचे होते. खरं तर हे कठीण काम होतं. पण एनसीबीला त्यांच्या खात्रीलायक सूत्रांकडून क्रूझमधील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यातही आर्यन खानचे नाव अगदी स्पष्ट होते. आर्यन आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र एनसीबी अधिकारी नेमण्यात आले होते.

सूत्रांच्या मते, आर्यन खानच्या नावाने क्रूझवर एकही खोली बुक केली गेली नव्हती. परंतु आयोजकाने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसाठी स्वतंत्र कॉम्प्लिमेंटरी रूम ठेवली होती. दोघेही त्या खास रुममध्ये जात असतानाच अचानक NCB चे अधिकारी दोघांच्या समोर आले आणि त्यांनी दोघांना आत जाण्यापासून रोखलं. जेव्हा दोघांची झडती घेण्यात आली तेव्हा आर्यन खानकडे काहीही सापडले नाही. परंतु अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये चरसची पुडी आढळून आली.

ADVERTISEMENT

यानंतर, NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले आणि तपासादरम्यान काही चॅट्स समोर आले. ज्यात दोघे चरस घेण्याविषयी बोलत होते. एनसीबीने आर्यनचा जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये त्याने एजन्सीच्या अधिकाऱ्यांना हीच गोष्ट सांगितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला हे देखील समजले आहे की आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हे ड्रग पेडलरच्या सतत संपर्कात होते. ज्याचा एनसीबी बराच काळ शोध घेत होते.

ADVERTISEMENT

NCB च्या चौकशीत मोठा खुलासा, आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन

आणखी एक ड्रग पेडलर ताब्यात

या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या एनसीबीच्या टीमला आणखी एक यश मिळाले आहे. तपास यंत्रणेने रविवारी रात्री उशिरा मुंबईत आणखी एका ड्रग पॅडलरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. एजन्सी आज (सोमवार) या प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे करू शकते.

या प्रकरणात आणखी अनेकांना अटक होऊ शकते. एनसीबीचे मुंबई युनिटचे प्रमुख समीर वानखेडे म्हणाले, ‘अनेक पैलूंचा अजून शोध घेणे बाकी आहे आणि अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. या प्रकरणात आम्ही आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. यातील तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तर उर्वरित पाच जणांना सोमवारी हजर करण्यात येणार आहे.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT