लोकल प्रवास करताना मास्क न लावल्यास भरावा लागणार दंड

मुंबई तक

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे तो हा आहे की मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावरील म्हणजेच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावला नसल्यास कारवाई केली जाणार आहे. फक्त लोकल ट्रेन्सच नाही सार्वजनिक वाहतूक करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे तो हा आहे की मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावरील म्हणजेच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावला नसल्यास कारवाई केली जाणार आहे. फक्त लोकल ट्रेन्सच नाही सार्वजनिक वाहतूक करत असणाऱ्या प्रवाशाने मास्क लावला नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान, खासगी कार्यालयांमध्ये, उद्यानात, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक अस्थापनांमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे प्रवास करताना किंवा सार्वजनिक मास्क लावला नाही तर 200 रुपये दंड घेतला जाणार आहे असंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?