Personal Finance: SIP सुरू आहे, पण Wealth का तयार होत नाही? तुम्ही 'या' 5 चुका टाळा!
SIP सुरू असूनही अपेक्षित Wealth तयार होत नसेल तर त्यामागे गुंतवणुकीची रक्कम, कालावधी आणि नियोजनाशी संबंधित काही सामान्य चुका असू शकतात.
ADVERTISEMENT

Personal Finance: आज अनेक नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबे नियमितपणे म्युच्युअल फंडात SIP करत आहेत. महिन्याला 2,000, 5,000, 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम गुंतवली जाते. मात्र, केवळ SIP सुरू केली म्हणजे मोठी संपत्ती तयार होईलच असे नाही. SIP ही गुंतवणुकीची पद्धत आहे; Wealth Creation साठी योग्य रक्कम, पुरेसा कालावधी, योग्य गुंतवणूक आणि सातत्य महत्त्वाचे असते.
अनेकदा SIP सुरू असूनही अपेक्षित Wealth तयार होत नाही, कारण गुंतवणूकदार काही सामान्य चुका करतात. या चुका वेळेत लक्षात घेतल्या तर गुंतवणुकीची दिशा अधिक व्यवस्थित करता येऊ शकते.
1. SIP ची रक्कम वर्षानुवर्षे तशीच ठेवणे
समजा एखाद्या व्यक्तीने नोकरीच्या सुरुवातीला महिन्याला 3,000 रुपयांची SIP सुरू केली. काही वर्षांनी त्याचा पगार वाढला, पण SIP मात्र 3,000 रुपयांवरच राहिली.
ही मोठी चूक ठरू शकते. उत्पन्न वाढत असताना गुंतवणुकीची रक्कमही हळूहळू वाढवणे म्हणजे Step-up SIP. उदाहरणार्थ, दरवर्षी SIP मध्ये 10 टक्के वाढ करण्याचा विचार करता येतो.
