Akash Thosar: भर उन्हात थांबला… अखेर त्याला आर्चीचा परश्या भेटला
सैराटमधला परश्या म्हणजेच आकाश ठोसरने अल्पावधीतच आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आकाशच्या ‘परश्या’ या भूमिकेची क्रेझ आजही इतक्या वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे. आकाशची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी तरुणींची आणि त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळते. आकाश त्याचा आगामी चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे. आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्ताने […]
ADVERTISEMENT

सैराटमधला परश्या म्हणजेच आकाश ठोसरने अल्पावधीतच आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
आकाशच्या ‘परश्या’ या भूमिकेची क्रेझ आजही इतक्या वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे.
आकाशची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी तरुणींची आणि त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळते.
आकाश त्याचा आगामी चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे.
आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार परिषद आणि कॉलेज प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना त्याला एक वेगळा अनुभव आला.
पत्रकार परिषद होईपर्यंत आकाशचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी, भर उन्हात थांबला होता. विशेष म्हणजे तो दिव्यांग होता.
आकाश आणि स्वतः नागराज मंजुळे यांनी या चाहत्याची पत्रकार परिषदेच्या धावपळीतून वेळ काढून भेट घेतली .