डबल टोल भरायचा नसेल तर आजच फास्ट टॅग काढा !
देशभरातील टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅगची संकल्पना आणली होती. केंद्र सरकारने देशातील सर्व वाहनधारकांना फास्ट टॅग लावून घेण्याचे आदेश दिले होते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत फास्ट टॅग सर्व वाहनधारकांना लावून घ्यावाच लागेल. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागेल असेही आदेश सरकारने दिले आहेत. देशातील […]
ADVERTISEMENT

देशभरातील टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅगची संकल्पना आणली होती. केंद्र सरकारने देशातील सर्व वाहनधारकांना फास्ट टॅग लावून घेण्याचे आदेश दिले होते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत फास्ट टॅग सर्व वाहनधारकांना लावून घ्यावाच लागेल. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागेल असेही आदेश सरकारने दिले आहेत.
देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅगची सोय उपलब्ध आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने फास्ट टॅग लावून घेण्यासाठी दोन-तीनवेळा मुदतवाढ दिली होती, पण आता ही मुदतवाढ मिळणार नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.
फास्ट टॅग म्हणजे काय?
फास्ट टॅग हा एका प्रकारचा डिजीटल स्टिकर आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच RFID या अद्ययावत यंत्रणेवर हे स्टिकर काम करतं.