FASTag ची कटकट संपणार, नंबरप्लेटद्वारे होणार टोल टॅक्सची वसुली, गडकरींनी सांगितली योजना
देशातली FASTag ची कटकट संपणार आहे. तसंच टोल प्लाझावर आता टोलवसुलीसाठी नंबर प्लेटचा वापर केला जाईल. सरकार नॅशनल हायवेवरून ऑटोमॅटिक नंबर प्लेट द्वारे टोल टॅक्स वसुली करण्याच्या योजनेवर काम करतं आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय रस्ते, परिवहन तसंच राजमार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी या संदर्भात माहिती दिली आहे. FASTag च्या ऐवजी […]
ADVERTISEMENT

देशातली FASTag ची कटकट संपणार आहे. तसंच टोल प्लाझावर आता टोलवसुलीसाठी नंबर प्लेटचा वापर केला जाईल. सरकार नॅशनल हायवेवरून ऑटोमॅटिक नंबर प्लेट द्वारे टोल टॅक्स वसुली करण्याच्या योजनेवर काम करतं आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय रस्ते, परिवहन तसंच राजमार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी या संदर्भात माहिती दिली आहे.
FASTag च्या ऐवजी नंबरप्लेटद्वारे होणार टोलवसुली
बिझनेस स्टँडर्ड मध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार सध्या FASTag द्वारे टोलवसुली केली जाते आहे. मात्र लवकरच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे हे काम करणार आहेत. कॅमेरे लावलेली ही मशीन ऑटोमॅटिक रिडरद्वारे नंबर प्लेटचं रिडिंग घेतील आणि त्याद्वारे टोलवसुली केली जाईल. हे पैसे ग्राहकाच्या बँक अकाऊंटमधून कट होतील
नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती देताना हे सांगितलं की या योजनेच्या पायलेट प्रोजेक्टवर काम करतो आहे. ही योजना अंमलात आणण्याआधी त्यामधले कायदेशीर खाचखळगेही तपासले जातील. त्यानंतर ही योजना लागू केली जाईल.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल प्लाझावर आता नंबर प्लेट रिडर कॅमेरे लावले जातील. त्यासंदर्भातली तयारी सुरू करण्यात आली आहे. जी कार किंवा जे वाहन यासमोरून जाईल त्याचा नंबर हे मशीन टीपणार आहे. त्यानंतर टोल टॅक्स वसुली ग्राहकाच्या बँक अकाऊंटमधून पैसे वजा होतील.