सोलापूर : रात्रपाळीवरुन आलेल्या बापाला पाण्याच्या पिंपात सापडला २५ दिवसांच्या बालकाचा मृतदेह

२४ तासांनंतरही आरोपी मोकाट, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
सोलापूर : रात्रपाळीवरुन आलेल्या बापाला पाण्याच्या पिंपात सापडला २५ दिवसांच्या बालकाचा मृतदेह
घटनास्थळी चौकशी करताना पोलीस अधिकारी

सोलापूरच्या नवी पेठ येथील मंगळवेढकर चाळीत एका २५ दिवसांच्या बाळाचा मृतदेह पाण्याच्या पिंपात आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्रपाळीवरुन आलेल्या वडिलांना आपल्या लहानग्या बाळाचा मृतदेह पाण्याच्या पिंपात आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. आपल्या मोठ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी सुरु असतानाच असा प्रसंग घडल्यामुळे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

या लहान बाळाचा जीव घेण्याचं कृत्य कोणी केलं आणि का केलं याबद्दल सध्या शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून पोलिसांनी या घटनेबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत बाळाचे वडील संकेत सुरवसे रात्रपाळीवरुन घरी आले. यावेळी पाळण्यात आपलं बाळ न दिसल्यामुळे संकेत यांनी आपली पत्नी प्रतीक्षाला बाळ कुठे आहे याबद्दल विचारलं. आपलं मुल पाळण्यात न दिसल्यामुळे घाबरलेल्या आईला जोरात कळ आल्यामुळे ती बाथरुमकडे गेली. यावेळी पत्नीसाठी पाणी आणायला गेलेल्या संकेत यांना आपल्या बाळाचा मृतदेह पाण्यात आढळला.

संकेत सुरवसे यांचे प्रतिक्षा यांच्याशी जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले होते. प्रतीक्षा यांचे माहेरही सोलापूरचेच आहे. त्यांना एक वर्षापूर्वी बाळ झाले.त्याचे नाव हर्षल ठेवण्यात आले. यानंतर 25 दिवसापूर्वी सुरवसे दाम्पत्याला हे दुसरे बाळ झाले. आज गुरुवारी पहिला मोठा मुलगा हर्षल याचा पहिला वाढदिवस असल्यामुळे सुरवसे दाम्पत्य तयारीला लागलं होतं. यासाठी संकेत यांची विवाहीत बहीण पुण्याहून सोलापूरला दोन मुलांसह आलेली आहे. त्यामुळे लहानग्या बाळाची हत्या कोणी आणि का केली याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in