पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: वडिलांची पहिली प्रतिक्रिया
बीड – बीडमधील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या वडिलांनी अखेर मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ‘मुंबई तक’ला पहिली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की, माझ्या मुलीच्या बदनामी करणाऱ्या बातम्या थांबवा, नाहीतर मी स्वत: आत्महत्या करेन.’ पूजा चव्हाण हिचे वडिल लहू चव्हाण […]
ADVERTISEMENT

बीड – बीडमधील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या वडिलांनी अखेर मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ‘मुंबई तक’ला पहिली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की, माझ्या मुलीच्या बदनामी करणाऱ्या बातम्या थांबवा, नाहीतर मी स्वत: आत्महत्या करेन.’
पूजा चव्हाण हिचे वडिल लहू चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. मुलीने पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं कर्ज आणि व्यवसायात झालेलं नुकसान यामुळे ती तणावात होती आणि त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसापासून पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत विविध स्वरुपाची माहिती समोर येत होती. या प्रकरणी विरोधी पक्षाकडून एका मंत्र्यावर देखील निशाणा साधला जात होता. मात्र, असं असूनही पूजा चव्हाण हिच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने याबाबत काहीही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र, आता या प्रकरणाबाबत तिच्या वडिलांनी ‘मुंबई तक’शी बोलताना अनेक गोष्टीचा खुलासा केला. पाहा पुजाचे वडिल नेमकं काय-काय म्हणाले.
हे देखील वाचा: पूजा चव्हाण आहे तरी कोण?