रशिया-युक्रेन संघर्षावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाल्या….
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस युद्धाचे भयंकर परिणाम दाखवणारे ठरले. अशात रशियन सैन्याची आगेकूच सुरू आहे. शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलं. मोक्याचं विमानतळही ताब्यात घेतल्याचा दावा रशियाच्या लष्कराने केला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. या सगळ्या परिस्थितीवर भारताच्या अर्थमंत्री […]
ADVERTISEMENT

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस युद्धाचे भयंकर परिणाम दाखवणारे ठरले. अशात रशियन सैन्याची आगेकूच सुरू आहे. शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलं. मोक्याचं विमानतळही ताब्यात घेतल्याचा दावा रशियाच्या लष्कराने केला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. या सगळ्या परिस्थितीवर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाची धग कायम; हवाई हल्ल्यांच्या कल्लोळात चर्चेच्या हालचाली
काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता पसरली आणि जगाला अशा आव्हानांचा सामना कधीच करावा लागला नाही. परंतू अलीकडील काही घटनांमुळे भारताचा विकास आव्हानात्मक झाला आहे. जगात निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांमुळे भारताच्या विकासाला आव्हान मिळणार आहे, अशी भीती व्यक्त करत जागतील शांतता धोक्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने अशाप्रकारची गंभीर परिस्थिती अनुभवलेली नाही.