मुंबईत कचऱ्याच्या गोदामाला आग
मुंबई तकः मुंबईमधल्या मानखुर्द विभागात कचऱ्याच्या गोदामात आग लागली आहे. ही लेव्हल तीनची आग असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या पोहोचल्या आहेत. ही आग भंगाराच्या गोदामात लागली आहे ज्यामध्ये कचऱ्याची काही दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास ही आग लागली होती. पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून दुपारी साडे तीनच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई तकः मुंबईमधल्या मानखुर्द विभागात कचऱ्याच्या गोदामात आग लागली आहे. ही लेव्हल तीनची आग असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या पोहोचल्या आहेत.
ही आग भंगाराच्या गोदामात लागली आहे ज्यामध्ये कचऱ्याची काही दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास ही आग लागली होती. पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून दुपारी साडे तीनच्या सुमारास देण्यात आलेल्या माहितीनुसार आगीत कोणालाही ईजा झालेली नाही.