Mumbra Fire: मुंब्रामधील हॉस्पिटलला भीषण आग, मृतांची यादी जाहीर
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आज (28 एप्रिल) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ 4 रुग्णांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. आता या चारही मृत रुग्णांच्या नावाची यादी स्थानिक प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. या भीषण आगीमध्ये रुग्णालयातील 2 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. […]
ADVERTISEMENT

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आज (28 एप्रिल) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ 4 रुग्णांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. आता या चारही मृत रुग्णांच्या नावाची यादी स्थानिक प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. या भीषण आगीमध्ये रुग्णालयातील 2 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला आहे.
प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमधील आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नावाची यादी
1. यास्मीन जफर सैय्यद – महिला (वय 46 वर्ष)
2. नवाब माजिद शेख – पुरुष (वय 47 वर्ष)
3. हलिमा सलमानी – महिला (वय 70 वर्ष)
4. श्री. सोनावणे – पुरुष
दरम्यान, भीषण आगीमुळे रुग्णालयातील अनेक रुग्ण हे गुदरमले असल्याने मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुंब्र्याचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या आगीबाबत माहिती देताना ते असं म्हणाले की, या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Mumbra Fire: मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग, 4 रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवताना रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याचं कामही केलं. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले.
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातून आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ज्यापैकी 6 रुग्ण हे आयसीयूमध्ये होते तर 14 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते. तर आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या इतर रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
‘चार’ भयंकर दुर्घटना ज्याने अवघा महाराष्ट्र हादरला अन् हळहळलाही…
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर
या घटनेची माहिती देताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे देखील स्पष्ट केलं की, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5-5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याशिवाय जखमींना 1 लाखांची मदत करण्यात येणार आहे.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीत 14 रुग्णांचा झाला होता मृत्यू
याआधी 23 एप्रिलला मुंबईच्या नजीक असणाऱ्या विरारमधील विजय वल्लभ या रुग्णालयाला देखील पहाटे लागलेल्या आगीत तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी या रुग्णालयाला आग लागली तेव्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. ज्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला होता.