IPL च्या उभारणीत ललित मोदींचं योगदान होतं ही वस्तुस्थिती – शरद पवार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यात संघर्षाचं वातावरण तयार झालेलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध उघडलेला मोर्चा यामुळे दररोज आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या परिस्थितीवर पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना प्रश्न विचारला होता. परंतू यावर भाष्य न करता पवारांनी थेट क्रिकेट आणि ललित मोदींवर भाष्य केलं आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यात संघर्षाचं वातावरण तयार झालेलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध उघडलेला मोर्चा यामुळे दररोज आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या परिस्थितीवर पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना प्रश्न विचारला होता. परंतू यावर भाष्य न करता पवारांनी थेट क्रिकेट आणि ललित मोदींवर भाष्य केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांच्या सन्मान सोहळ्यात शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना पवारांनी ललित मोदींचं कौतुक केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, ‘ललित मोदी यांनी खेळात जे योगदान दिलं त्याबाबत मी बोललो. मी बाकी काही बोललो नाही. त्याचा काही माझा विषय नव्हता इथे. पण ही गोष्ट खरी आहे की आज जगात आयपीएलचं नाव झालं आहे. महाराष्ट्राचा आपला एकच गेम असा आहे जो महाराष्ट्रातून जगात गेलाय आणि जगातील खेळाडू महाराष्ट्रात येत आहेत. त्या आयपीएलच्या निर्मितीमध्ये मी अध्यक्ष असताना जो निर्णय घेतला त्याच्या उभारणीमध्ये ललित मोदी यांचं योगदान होतं ही वस्तुस्थिती आहे’, असं पवार म्हणाले.
14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर