जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

व्यंकटेश दुदुमवार, प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जांबिया) हद्दीत आज 14 जानेवारी 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांबिया) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जांबिया) आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.

नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय 30 वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटून क्र. 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य आणि नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मिलिंद तेलतुंबडे शहीद’ 27 नक्षली मारले गेल्यानंतर नक्षली संघटनांची पहिली प्रतिक्रिया

2008 ला पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक आणि राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता, उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच 2010 मध्ये मिरकल फाटा चकमकीत आणि तोंडेर येथील रहिवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता. 2009 रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता.

ADVERTISEMENT

त्याचबरोबर 14/08/2020 रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. 11/06/2020 रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन 2021 मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच 18/09/2021 मध्ये रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, 26/02/2021 रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व 03/04/2021 रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच 11/01/2022 रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता.

ADVERTISEMENT

जिल्ह्यातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असून त्याच्यावर खालील प्रमाणे एकुण 16 गुन्हे दाखल होते. खुन 06, चकमक 04, दरोडा 02, जाळपोळ 03, अपहरण 01.त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदर अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT