गुगलने चूक सुधारली, पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावं मॅपवर

गुगलवर आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावं येत आहेत आधी बदललेली नावं येत होती...
Google removed the changed names of Aurangabad and Osmanabad after several complaints
Google removed the changed names of Aurangabad and Osmanabad after several complaints

गुगल मॅपने केंद्र सरकारच्या मंजुरीपूर्वीच बदलेले औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव हटवले आहे. शिंदे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नाव देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. मात्र, केंद्राकडून मंजुरी मिळण्याच्या आदीच गुगल मॅपवर औरंगाबादला 'संभाजीनगर आणि उस्मानाबादला 'धाराशिव' असं नाव देण्यात आलं होतं. केंद्राच्या मंजुरीपूर्वीच गुगलकडून असे बदल करण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात विरोध झाला.

तक्रारीनंतर बदलेली नावे गुगलने हटवली त्याजागी औरंगाबाद उस्मानाबाद हे परत ठेवलं

काही तक्रारी देखील गुगलकडे करण्यात आल्या. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता गुगलला उपरती झाली असून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराची बदलेली नावे हटवण्यात आली आहे. गुगलवर आता पुर्वीप्रमाणे औरंगाबाद आणि उस्मानाबाद असे नाव दिसत आहेत. राज्य सरकारकडून एका महिन्यात दोनदा या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी देण्यात आली आहे.

ठाकरे सरकारने जाताजाता आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये या नामांतराच्या ठरावा मंजुरी दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ठाकरे सरकारमध्ये घेण्यात आलेले निर्णय़ अवैध ठरवून ते रद्द करुन पुन्हा नव्याने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्यसरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्तावाला मंजुरी देत केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवलं आहे. राज्य सरकारच्या नामातंराच्या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी येणे बाकी आहे.

उद्धव ठाकरे सरकारने मंजुरी दिल्यापासून नामांतराला विरोध व्हायला सुरुवात झाली होती. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत देखील याला विरोध केला होता. असे वातावरणअसताना गुगलवर औरंगाबादचे नाव टाकल्यानंतर औरंगाबादच्या खाली संभाजीनगर, असे दिसू लागले होते. त्यामुळे यावरुन सोशल मीडियावर टीका होत होती.

खा. इम्तियाज जलील यांनी केली होती तक्रार

गुगलने दोन्ही शहराचे नाव बदलल्यानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुगल व्यावस्थापनाकडे तक्रर केली होती. केलेल्या बदलावर सवाल उपस्थित करत ही नावे कशाच्या आधारे बदलली आहेत, असा सवाल जलील यांनी केला होता. त्यांच्यासह अनेकांनी गुगलकडे तक्रारी केल्यानंतर बदलेली नावे हटवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in