Mumbai Building collapse: मुंबईत इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू, सातजण जखमी

मुंबई तक

मुंबईतल्या गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. या सगळ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी पहाटे 4.58 ला ही घटना घडली आहे. सात जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. या सगळ्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेड आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबईतल्या गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. या सगळ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी पहाटे 4.58 ला ही घटना घडली आहे. सात जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. या सगळ्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेड आणि महाडमध्ये पूरस्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूरलाही पुराचा धोका आहे. रायगडमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या स्थितीत मुंबईत इमारतीचा भाग कोसळण्याचीही घटना घडली आहे. मुंबईतल्या गोवंडी या ठिकाणी असलेल्या 1+1 इमारतीचा भाग कोसळला या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर सात जणांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी सहा तास बचाव कार्य सुरू होतं. आता ढिगारा आणि इमारतीचा कोसळलेला भाग उपसण्याचं काम सध्या सुरू आहे.