राज्यपालांची काळी टोपी आणि राहुल गांधींचा सवाल, पाहा कोश्यारी का संतापले - Mumbai Tak - governor bhagat singh koshyari black cap rss rahul gandhi congress bjp - MumbaiTAK
बातम्या

राज्यपालांची काळी टोपी आणि राहुल गांधींचा सवाल, पाहा कोश्यारी का संतापले

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेगळ्याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. ‘भारतीय संसद मे भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करत असतानाच कोश्यारींनी राहुल गांधींविषयीचा एक किस्सा सांगितला. त्यात त्यांनी ते परिधान करीत असलेल्या काळ्या टोपीवरुन राहुल गांधी यांनी नेमकी काय […]

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेगळ्याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. ‘भारतीय संसद मे भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करत असतानाच कोश्यारींनी राहुल गांधींविषयीचा एक किस्सा सांगितला. त्यात त्यांनी ते परिधान करीत असलेल्या काळ्या टोपीवरुन राहुल गांधी यांनी नेमकी काय टिप्पणी केली होती आणि आपण त्यांना कसं उत्तर दिलं होतं. हे सांगितलं.

राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी दिल्लीत एका छोटोखानी समारंभात आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी कुमार चौबे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू हे देखील उपस्थित होते.

‘ही RSS ची काळी टोपी आहे’

भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘अनेक जण माझी काळी टोपी पाहून अशी प्रतिक्रिया देतात की, जसं एखादा बैल लाल कपडा पाहून वागतो तसं. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा राहुल गांधींनी मला विचारलं होतं की, तुम्ही काळी टोपी का परिधान करतात?, मी त्यांना म्हटलं की, उत्तराखंडमधील लोक ही टोपी परिधान करतात. तेव्हा ते मला म्हणाले की, ‘नाही-नाही.. तुम्ही RSS चे आहात म्हणून ही टोपी परिधान करता. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, मी RSS सोबत जोडलेला आहे. पण टोपी उत्तराखंडमधील आहे. पण RSS च्या स्थापनेआधी उत्तराखंडमघील लोकं ही टोपी परिधान करत आलेले आहेत.’

‘सावरकर आरएसएसमध्ये होते असं राहुल गांधी म्हणतात’

कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी मला तोच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, ही RSS ची टोपी नाही. याआधी देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, तुम्ही आरएसएसबद्दल काही वाचलं आहे का? तेव्हा ते म्हणाले की, हो.. मी सावरकरांबाबत वाचलं आहे.’

यावरुन कोश्यारी यांनी पुढे असंही सांगितलं की, ‘सावरकर हिंदू विचारसरणीचे होते, पण ते कधीही आरएसएसशी निगडीत नव्हते. यावरुन राहुल गांधींचं ज्ञान समजतं.’

‘भारतीय संसदेत भगतसिंग कोश्यारी’ या पुस्तकात याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोश्यारीच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण छायाचित्रेही या 450 पानांच्या पुस्तकात संकलित करण्यात आलं आहे.

या विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संसदेच्या अधिवेशनात विरोधकांच्या वृत्तीवर टीका केली. तसेच संसदेत खासदार म्हणून भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुकही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + six =

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!