वरातीत नाचत राहिला आणि बिनलग्नाचा घरी परतला, वाचा बुलढाण्यातील न झालेल्या लग्नाची गोष्ट

संध्याकाळी चार वाजता येणारा नवरेदव आठ वाजता मंडपात आला, मुलीच्या घरच्यांनी लग्न मोडलं
वरातीत नाचत राहिला आणि बिनलग्नाचा घरी परतला, वाचा बुलढाण्यातील न झालेल्या लग्नाची गोष्ट
प्रातिनिधीक फोटो

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग असतो. परंतू बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एका नवरदेवाची लग्नाच्या दिवशीच चांगली फजिती झाली. वरातीत नाचत राहिल्यामुळे मुहूर्त उलटून गेल्यानंतर 4 तासांनी नवरदेव आणि मंडळी मंडपात पोहचले. परंतू यावेळी मुलीकडच्या लोकांनी उशीर झाल्यामुळे मुलाला जाब विचारत थेट लग्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलला बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी आपल्या घरातून निघालेला नवरदेव दारु पिऊन वरातीत मनसोक्त नाचला. परंतू यामध्ये आपल्या लग्नाचा मुहूर्तच नवरदेव विसरुन गेला. दुसरीकडे मंडपात मुलीकडची मंडळी मुलाची वाट पाहत होती.

वरातीत नाचत राहिल्यामुळे मुलाकडी मंडळी आठ वाजता मंडपात पोहचली. यावेळी मुलीकडच्या मंडळींनी उशीर का झाला म्हणून मुलाला जाब विचारला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली. यावेळी संतापलेल्या मुलीकडच्या मंडळींनी स्वयंपाकाच्या भांड्यांनी मुलाच्या घरातील मंडळींना मारहाण करत लग्न लावणार नाही अशी भूमिका घेतली.

लग्न रद्द झाल्यामुळे मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतू यानंतर त्यांनी नात्यातील एका मुलाशी तिचं लग्न लावून देत त्याच दिवशी विवाहसोहळा उरकून घेतला. बुलढाण्यात सध्या या घटनेची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.