H3N2, H1N1 अन् कोरोना: एकाचवेळी 3 रोगांचा धोका… जाणून घ्या फरक, लक्षणं, उपचार
मुंबई : H3N2, Covid-19, H1N1म्हणजेच स्वाईन फ्लूमुळे भारतात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या H3N2 ची अनेक प्रकरणं समोर येत असली तरी, भारतात स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 हजार 623 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय 28 फेब्रुवारीपर्यंत H1N1 च्या एकूण […]
ADVERTISEMENT

मुंबई : H3N2, Covid-19, H1N1म्हणजेच स्वाईन फ्लूमुळे भारतात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या H3N2 ची अनेक प्रकरणं समोर येत असली तरी, भारतात स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 हजार 623 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय 28 फेब्रुवारीपर्यंत H1N1 च्या एकूण 955 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. (H3N2, H1N1 and Corona : Learn the difference, symptoms and treatment)
H1N1 चे हे सर्व रुग्ण तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय 2 जानेवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीत H3N2 वेरिएंटच्या 451 रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, H3N2 प्रकारामुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, आसाममध्ये अलीकडे H3N2 च्याही रुग्णांची नोंद झाली आहे.
H3N2, Covid-19, H1N1 हे सर्व श्वसनाशी संबंधित आजार आहेत. पण अशा परिस्थितीत त्यांची लक्षणं कशी ओळखायची आणि तुम्हाला कोणता संसर्ग झाला आहे हे कसं ओळखायचं आणि त्यावर कसे उपचार करायचे असा प्रश्न हमखास पडतो.
H1N1 आणि H3N2 :
H1N1 याला स्वाईन फ्लू म्हणूनही ओळखलं जातं. हा आजार एक इन्फ्लूएंझा विषाणूप्रमाणेच प्राण्यांमध्ये होणाऱ्या रोगांमुळे होतो. तसंच हवामान बदलामुळे लोकांना फ्लू आणि सामान्य पद्धतीची सर्दीही होते. पण या आजारामुळे शरीराला धोका पोहोचत नाही.