मुंबईत Corona ची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली आहे का? डॉ. शशांक जोशी म्हणतात..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे कारण मुंबईत कोरोनाचे रूग्ण कमी होऊ लागले आहे. मुंबईकरांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. तरीही नेमकं काय घडलं आहे? त्यावर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी उत्तर दिलं आहे.

डॉ. शशांक जोशींनी काय दिली आहेत उत्तरं जाणून घ्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई आणि महाराष्ट्रात दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणता येईल का?

मुंबईत लाट ओसरली आहे असं थेट म्हणता येणार नाही.. पण त्याची सुरूवात झाली आहे असं नक्कीच म्हणता येईल. 4 एप्रिलला मुंबईत 11 हजारांपेक्षा जास्त रूग्ण होते. त्यावेळी मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 28 टक्के होता. तो आता 13 ते 14 टक्क्यांवर आला आहे. या आठवड्याचा रेट जो आहे तो 15 टक्के आहे. तरीही आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे. आपल्याला मुंबईतल्या पाच टक्क्यांच्या खाली आणायचं आहे. बरं मुंबईत जरी लाट ओसरू लागली असली तरीही महाराष्ट्रात मात्र तसं चित्र नाही. महाराष्ट्रात दुसरी लाट आहे आणखी दीड महिना यातून सावरण्यासाठी लागणार आहे.

ADVERTISEMENT

Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?

ADVERTISEMENT

लॉकडाऊनमुळे ही लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे का? आणि अनलॉक होईल तेव्हा रूग्ण वाढू शकतात का?

हो आपण निर्बंध लादले आहेत. लोक घरी बसले आहेत या सगळ्याचा परिणाम झाला आहेच. मात्र मुख्य गोष्ट आहे कोरोनाची लाट ओसरल्यानंतर जेव्हा अनलॉकिंग होईल तेव्हा काळजी घेणं जास्त आवश्यक आहे असं डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आली ती अत्यंत वेगाने आली. या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने झाला ही बाब लक्षात घेतली पाहिजे. दुसरी लाट जास्त काळ राहिली आहे. चार आठवडे झाले आहेत त्यामुळे ही लाट खाली यायलाही महाराष्ट्रात वेळ लागेल आणखी दीड एक महिन्याने चित्र बदलेलं दिसेल. कठोर निर्बंध आणि ब्रेक द चेनमुळे फरक पडला आहे. मात्र जेव्हा अनलॉक होईल तेव्हा काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. मास्किंग आणि व्हॅक्सिनेशन यावर आपल्याला प्रचंड भर द्यावा लागेल.

1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टेस्टिंग 50 हजारांच्या घरात होत होतं आणि आता टेस्टिंग 40 ते 45 हजारांच्या घरात आहे त्यामुळे कोरोना रूग्णसंख्या कमी होते आहे का?

मुंबईतचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जो पॉझिटिव्हीटी रेट होता तो जवळपास 28 टक्के होता. आता तो 13 ते 14 टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे या लाटेतले मुंबईत अर्धे रूग्ण कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. मुंबईतला मृत्यूदरही कमी झाला आहे. डबलिंग टाईमही कमी झालं आहे त्यामुळे लाट ओसरू लागली आहे हे दिसतं आहे. मात्र कठोर निर्बंधांची गरज आहे आणि अनलॉकिंग खूप काळजीपूर्वक करावं लागेल आणि कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेच लागतील. मागच्या वेळी लाट धारावी किंवा झोपडपट्ट्यांमध्ये होती आताची लाट ही मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांच्यात जास्त पसरली असंही दिसून आलं आहे.

Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?

अनेकांमध्ये अँटीबॉडी निर्माण झाल्या असूनही कोरोना झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत त्याबद्दल काय सांगाल?

व्हायरसमध्ये जो म्युंटट आला आहे त्यामुळे हे घडतं आहे. लस घेतली असेल अँटी बॉडीज असतील तरीही कोरोना होऊ शकतो. मास्क लावणं हे आपल्याला 2023 पर्यंत तरी अत्यंत आवश्यक आहे.

नवीन म्युटंटचा उल्लेख केलात त्यानुसार आता कोव्हिड प्रोटोकॉलमध्ये काही बदल आवश्यक आहे का?

आपल्याला कुठलाही गंभीर आजार झाला तर आपण औषध घेतो. अँटी व्हायरल औषधं घेतो. कोरोनामध्ये आत्ता जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे त्यामध्ये बदल करण्याची काही गरज नाही. तसंच कोव्हिडच्या प्रोटोकॉलमध्येही बदल करणं गरजेचं नाही. या लाटेत जो म्युटंट आला आहे तो झपाट्याने कोरोना पसरवतो आहे. रूग्णसंख्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे असं वाटू शकतं की मृत्यू दर वाढला आहे. मात्र तसं चित्र आत्ता महाराष्ट्रात नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT