उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार तुम्हाला दिला आहे का? शरद पवार हसून म्हणाले….

मुंबई तक

एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनांशी शरद पवारांनी सोमवारी चर्चा केली. यावरून आज शरद पवार यांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे यांची तब्बेत चांगली नाही ते सध्या आराम करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी तुमच्याकडे दिला आहे का? असा प्रश्न भाजप विचारत आहे. असं शरद पवारांना विचारलं जाताच ते हसले आणि त्यांनी हसतच या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनांशी शरद पवारांनी सोमवारी चर्चा केली. यावरून आज शरद पवार यांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे यांची तब्बेत चांगली नाही ते सध्या आराम करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी तुमच्याकडे दिला आहे का? असा प्रश्न भाजप विचारत आहे. असं शरद पवारांना विचारलं जाताच ते हसले आणि त्यांनी हसतच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पत्रकारांनी आज शरद पवारांना विचारलं असता त्यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं.

उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार

शरद पवार म्हणाले की हे वक्तव्य ज्या भाजप नेत्याने केलं आहे त्यांच्या ज्ञानाचं आणि बुद्धीचं मी कौतुक करतो. शरद पवार पुढे म्हणाले की एखाद्या कामगार संघटनेने बोलावलं तर मला चर्चा करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराने चर्चा करणं हे काहीही चुकीचं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतात. त्यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांना समोर येण्यासाठी मर्यादा होत्या. सोमवारी आम्ही जी चर्चा केली ती त्यांच्यापर्यंत पोहचली असणार यात शंकाच नाही. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ एकत्र विचार करून घेते असं शरद पवार यांनी सांगितलं.

गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….

हे वाचलं का?

    follow whatsapp