Pathaan : मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला… हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

मुंबई तक

Pathaan Movie Controversy News : मुंबई : पठाणने चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. शनिवारच्या सुट्टीचा पठाण चित्रपट आणि शाहरुख खानला चांगलाच फायदा झाला आहे. शाहरुखच्या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडेही समोर आली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने चौथ्या दिवशी ५२ कोटी रुपये जमा केले. यासोबतच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्ये भारतात २०० […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pathaan Movie Controversy News :

मुंबई : पठाणने चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. शनिवारच्या सुट्टीचा पठाण चित्रपट आणि शाहरुख खानला चांगलाच फायदा झाला आहे. शाहरुखच्या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडेही समोर आली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने चौथ्या दिवशी ५२ कोटी रुपये जमा केले. यासोबतच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्ये भारतात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शनने ४ दिवसांत ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. (Hemangi Kavi slams netizens for unfollowing her for being pathaan shah-rukh khan fan you’ll be forever pathan)

एका बाजूला पठाण सुपरहिट ठरत असतानाच दुसऱ्या बाजूला चित्रपटावरुन होणार वाद सुरुच आहेत. आधी बिकिनी आणि बायकॉटच्या वादाने पठाण चर्चेत आला होता. त्यानंतर आता पठाण चित्रपटानिमित्त शाहरुख खानवर लिहिलेली मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आली असून, या पोस्टवरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही, असं हेमांगी कवीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Pathaan : पठाणचा जलवा चौथ्या दिवशीही कायम; 400 कोटींचा टप्पा पार

हे वाचलं का?

    follow whatsapp