PM Cares Trust वेबसाईटवरून मोदींचा फोटो हटवण्याच्या याचिकेबाबत बॉम्बे हायकोर्टाने केंद्राकडे मागितलं उत्तर

विद्या

PM Cares Trust च्या वेबसाईटवरून मोदींचा फोटो आणि नाव हटवण्याच्या मागणीसाठी जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याबाबत बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला उत्तर मागितलं आहे. ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सदस्याने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एए सय्यद आणि न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. याचिकाकर्ते विक्रांत चव्हाण यांनी अधिकृत संकेतस्थळावरून राष्ट्रीय चिन्ह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

PM Cares Trust च्या वेबसाईटवरून मोदींचा फोटो आणि नाव हटवण्याच्या मागणीसाठी जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याबाबत बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला उत्तर मागितलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सदस्याने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एए सय्यद आणि न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. याचिकाकर्ते विक्रांत चव्हाण यांनी अधिकृत संकेतस्थळावरून राष्ट्रीय चिन्ह आणि राष्ट्रध्वजाच्या प्रतिमा हटवण्याची मागणी केली आहे.

या याचिकेत असं म्हटलं आहे की वेबसाईटवर असा फोटो दाखवणे हे भारतीय संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन करणारं आहे. त्यामुळे याचिकेमध्ये फोटो आणि नाव हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.विक्रांत चव्हाण यांनी याचिकेत असंही म्हटलं आहे की पीएम केअर्स फंड हे आपात्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती अशावेळी मदत वाढवण्यासाठी असतात. यामध्ये खासगी संस्था, व्यक्ती यांच्याकडून दान मिळावं ही अपेक्षा असते.

केरळमध्येही याचिका

हे वाचलं का?

    follow whatsapp