केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नकोत, गृहमंत्र्यांचाही राजीनामा घ्या – चंद्रकांत पाटलांची मागणी

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी
हेमंत नगराळे मुंबईचे  नवे पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणामध्ये वाझे यांचा सहभाग होता हे आता निष्पन्न झालंय. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक गंभीर झालेलं असून केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या घेऊन भागणार नाही, महाविकास आघाडी सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत हेमंत नगराळे यांना आयुक्तपदावर संधी दिली आहे.

दरम्यान या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना विरुद्ध भाजप हा राजकीय सामना चांगलाच रंगलेला दिसत आहे. नवीन बदलीनुसार परमबीर सिंग यांची होमगार्डमध्ये बदली करण्यात आली. कोल्हापुरात बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामाच केला.”राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्यामुळे जनता नाराज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अक्षरशः लिलाव पद्धतीने बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे या बदल्यांविषयी महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. वाझे प्रकरणात केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन चालणार नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेतला पाहिजे”, अशी मागणी पाटील यांनी केली.

भाजपने विधानसभेत सरकारवर दबाव आणल्यानंतर वाझेंची पहिल्यांदा बदली करण्यात आली. NIA ने तपास हाती घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वाझे यांना मोठं राजकीय संरक्षण आहे. यामुळेच त्यांना सातत्याने वाचवण्याचा आणि सांभाळून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून झाल्याचंही पाटील म्हणाले.

हेमंत नगराळे मुंबईचे  नवे पोलीस आयुक्त
मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत घडलेल्या घटनांसाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलंय. या सर्व गोष्टींची नैतिक जबाबदारी स्विकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये.

याचसोबत सचिन वाझे हे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी म्हणून पोलीस दलात बसले होते अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

क्राईम इंटलिजिन्स युनिट हे मुंबई पोलिसांमधलं सर्वात महत्त्वाचं खातं आहे. या खात्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी ठाकरे सरकारने सचिन वाझेंना दिली. कोणत्याही हद्दीत हाय प्रोफाईल घटना घडली की ते प्रकरण CIU कडे येत होती. बादशाह रॅपरचं प्रकरण, ऋतिक रोशनचं प्रकरण हे सगळं CIU कडेच देण्यात आलं होतं. मुंबई पोलीस खात्यात जर आयुक्तांनंतर कुणाला महत्त्व होतं तर ते सचिन वाझेंचं होतं. एक वेगळीच उंचीच सचिन वाझेंना ठाकरे सरकारने दिली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in