मुंबईत होम क्वारंटाईनचा कालावाधी सात दिवसांचा! काय काळजी घ्याल? वाचा नियमावली

मुंबई तक

मुंबईत दिवसभरात 20 हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाने मुंबईचं टेन्शन वाढवलं आहे. तसंच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचेही सर्वाधिक रूग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी नव्या गाईडलाईन्स आणण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसांचा करण्यात आला आहे. सहव्याधी असल्या तरीही ज्यांना कोरोनाची लक्षणं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत दिवसभरात 20 हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाने मुंबईचं टेन्शन वाढवलं आहे. तसंच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचेही सर्वाधिक रूग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी नव्या गाईडलाईन्स आणण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसांचा करण्यात आला आहे.

सहव्याधी असल्या तरीही ज्यांना कोरोनाची लक्षणं नाही तर किंवा अत्यंत सौम्य स्वरूपातली लक्षणं आहेत अशा कोव्हिड रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेता येणार आहेत. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह आढळल्याच्या सातव्या दिवशी सलग तीन दिवस ताप नसेल तर या रूग्णांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपणार आहे. लसीकरण पूर्ण झालेली व्यक्ती कोव्हिड प्रतिबंधच नियम पाळून 24 तास रूग्णाची काळजी घेऊ शकणार आहे. यासंदर्भातली नियमावलीच आता मुंबई महापालिकेने आणली आहे.

मुंबई लोकल बंद होणार का? काय निर्बंध लागणार? राजेश टोपेंनी दिलं सविस्तर उत्तर, म्हणाले…

काय आहे नवी नियमावली?

हे वाचलं का?

    follow whatsapp