बाबासाहेब पुरंदरे: 'जाणता राजा' कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा

Babasaheb Purandare Janta Raja: बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाची निर्मिती कशी केली? जाणून घ्या याविषयी.
बाबासाहेब पुरंदरे: 'जाणता राजा' कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा
How was the produced Janata Raja interesting story behind it babasaheb purandare(फाइल फोटो)

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचसोबत अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. यामध्ये काही जणांनी 'जाणता राजा' हे भव्य दिव्य नाटक नेमकं कसं घडलं याविषयी देखील सांगितलं.

बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हे नाटक ज्या भव्यतेने सर्वांसमोर आणलं त्या पद्धतीने आजतागायत कोणालाही नाटकाची बांधणी करता आलेली नाही. शेकडो नटांचा ताफा आणि सजीव प्राण्यांच्या मदतीने बाबासाहेबांनी एका भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली. पण या नाटकाच्या निर्मितीचा प्रवास फारच कठीण होता. बाबासाहेबांच्यासोबत तब्बल 56 वर्ष काम करणाऱ्या दिवाकर पांडे यांनी या नाटकाची नेमकी कथा सांगितली आहे.

अशी झाली 'जाणता राजा'ची निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भव्यदिव्य नाटकाची निर्मिती करावी अशी बाबासाहेबाची इच्छा होता. त्यामुले सगळ्यात आधी ते इंग्लंडला गेले. त्यावेळी त्यांनी तिथली काही नाटकं पाहिली. त्या नाटकांवरुन त्यांनी स्फूर्ती घेतली, अशा प्रकारची भव्य-दिव्य नाटकं आपल्याकडे झाली पाहिजेत. ज्यामध्ये जिवंत प्राणी स्टेजवर वापरुन त्यांचा प्रत्यक्ष देखावा निर्माण करावा हे त्यांच्या मनात होतं.

इंग्लंडमधून इथे आल्यावर बाबासाहेबांनी 1978 साली तसे प्रयत्न सुरु केले. अनेक कलाकारांना त्यांनी त्यांच्यासोबत घेतलं त्यांना प्रशिक्षण दिलं. त्यांच्यासोबत अगदी साधी-साधी मुलं होती. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना शिक्षण देऊन त्यांच्याबरोबर त्यांना काम करायला लावलं. त्यांचे डायलॉग म्हणायला लावले. त्यांना इतिहासात रममाण केलं.

हे सगळं नाट्य 1985 साली प्रत्यक्ष स्टेजवर आलं. त्यावेळी सुरु केलेलं भव्यदिव्य नाटक ते आजतागायत त्याच पद्धतीने सुरु आहे. आजही जाणता राजाचे सगळे प्रयोग हे हाऊसफुल असतात. हे नाटक सुरु करताना त्यामागे व्यावसायिक उद्देश अजिबात नव्हता. पण नंतर या नाटकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

जेव्हा या नाटकाला बाबासाहेबांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी ज्या मुलांना नाटकासाठी आणलं तेव्हा अनेकांना वाटलं की, हे काय स्वप्न आहे हे काही शक्य होणार नाही. परंतु बाबासाहेबांनी चिकाटी सोडली नाही. सगळ्यांना समजावून, छोट्या-छोट्या मुलांना जे बाल शिवाजी साकारायचे यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आवड निर्माण केली. दहा-दहा तास तालीम करणं या सगळ्या कठीण परिश्रमातून हे नाटक उभं राहिलं.

या नाटकात कुणीही सुप्रसिद्ध असा नट नव्हता. सर्व नव्या टीमला सोबत घेऊन हे घडवून आणणं हे फार कठीण होतं. पण बाबसाहेबांनी अजिबात चिकाटी सोडली नाही.

या नाटकासाठी बाबासाहेबांनी जी तयारी केली ती त्यांनी केलीच मुळी परदेश दौऱ्यातून. सुरुवातील त्यांनी रोममध्ये एक बॅले पाहिला तो खूपच भव्य होता. हत्ती, घोडे, उंट हे सगळं स्टेजवर होतं. पीन जरी पडली तरी त्याचा आवाज हा प्रेक्षकापर्यंत जाऊन पोहचतो इथपर्यंत त्यांची साउंड व्यवस्था असते.

याचा अभ्यास त्यांनी तिथे केलेला होता. त्याच बरोबर माऊस ट्रॅप म्हणून एक नाटक होतं लंडनमध्ये. ते नाटक त्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या डोक्यात ते एवढं भिनलं होतं की, त्यांनी त्याच वेळेस मला लंडनवरुन पत्र पाठवलं होतं.

कुठलीही गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वाला घेऊन जायची ही बाबासाहेबांची खासियत होती. त्यांनी मला सांगितलं की, आपल्याला हे नाटक करायचं आहे. इथे आल्यानंतर त्यांनी लागलीच आम्ही तालमीला सुरुवात केली जाणता राजाच्या.

सुरुवातीला शिवकल्याण राजामध्ये बाबासाहेब हे स्वत: शाहिराचं काम करायचे, निवदेनाचं काम करायचे. इथे आल्यानंतर त्यांनी आमचा शाहीर निवडला. हातात परात घ्यायची आणि पोवाडे म्हणायचे अशाप्रकारे आमच्या तालमीला सुरुवात झाली.

How was the produced Janata Raja interesting story behind it babasaheb purandare
Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन

ते स्वत: सगळं करुन दाखवायचे. नाटकातील प्रत्येक बारकावे ते समजून सांगायचे. या नाटकासाठी चार शिवाजी महाराज तयार करावे लागेल. दोन-तीन जिजाऊ साहेब तयार कराव्या लागल्या. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पत्नी वैगरे.. अशी असंख्य पात्र तयार करावी लागत असे. तरुणांवर त्यांनी विश्वास टाकला. याच सगळ्या मेहनतीतून 1985 साली बाबासाहेब पुरंदरेच्या मनातील नाटक हे सत्यात उतरलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in