मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर: ‘राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी उद्याच खासदारकीचा राजीनामा देईन.’ असं परखड मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले असून त्यानिमित्तानं सोलापुरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्याने जर आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर उद्याच राजीनामा देण्यासाठी तयार आहेत.

27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा, संभाजीराजे छत्रपती आवाहन

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण स्वीकारले नाही. मराठा आरक्षणाबाबत मार्ग कसा काढायचा यासाठी आजचा दौरा आहे. ज्यांनी समाजाला वेळ दिला, त्याग केला त्यांना भेटण्यासाठी हा दौरा असल्याचे मत खा. संभाजीराजे यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

ADVERTISEMENT

  • मी हे म्हणणार नाही राज्य शासनाने केलेली मांडणी चांगली होती. कोणाची चूक काय झाली त्यापेक्षा मार्ग काढण्यासाठी हा दौरा आहे.

ADVERTISEMENT

  • शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण दिले बहुजन समाजाला. वेळप्रसंगी केंद्राने काय भूमिका घ्यायची. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते शासनाने द्यायला पाहिजे. सारथी, अण्णाभाऊ महामंडळ, वसतिगृह शासनाने द्यायला हवी.

  • मराठा आरक्षण ही माझ्या पक्षाती भूमिका नाही. ही समाजाची भूमिका आहे. माझी भूमिका आहे.

  • सप्टेंबर 2009 पूर्वीच्या मराठा तरुणांच्या नोकऱ्यांच्या नियुक्त्या द्यायला हव्यात.

  • मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुणीही पुढं येत नाही. कुणी आलं का पुढं? पण मी समाजासाठी झटतोय.

  • फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण ‘फुलप्रुफ’ असतं तर राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती-उद्धव ठाकरे

    • समाजाचा आवाज उठवणे. समाजासाठी काम करत राहणे. संसदेमध्ये आवाज उठवणार, आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे.

    • अॅक्शन प्लॅन समाज ठरवणार आहे. पुढील दिशा 27, 28 तारखेला समजेल.

    • राजीनामा देऊन आरक्षण मिळत असेल तर उद्या देतो.

    • देशातील भारतातील शिवजयंती मोठ्या प्रमाणात मी केली. राष्ट्रपती भवनात, संसदेमध्ये मध्ये पहिली शिवजयंती आम्ही सुरू केली.

    • मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांना आरक्षणासाठी येत्या 28 तारखेला भेटणार.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT