पेट्रोल-डिझेलचे दर 25-30 रूपये कमी केले असते तर मोठं मन दिसलं असतं-संजय राऊत
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर 25-30 रूपयांनी कमी केले असते तर त्यांचं मोठं मन दिसलं असतं. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून बेहिशोबी पैसे केंद्र सरकारने कमावले आहेत अशी टीका आता संजय राऊत यांनी केली आहे. तसंच दिवाळी साजरी करावी असं वातावरण देशात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर 25-30 रूपयांनी कमी केले असते तर त्यांचं मोठं मन दिसलं असतं. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून बेहिशोबी पैसे केंद्र सरकारने कमावले आहेत अशी टीका आता संजय राऊत यांनी केली आहे. तसंच दिवाळी साजरी करावी असं वातावरण देशात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच-दहा रूपयांनी कमी करून काही होणार नाही. देशभरात दिवाळीचं वातावरण नाही. भाजपला पूर्णपणे हरवावं लागणार आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच पोट निवडणुकीत फटका बसल्याने भाजपने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक हे जोपर्यंत इंटरव्हल करत नाहीत तोपर्यंत मी काही करणार नाही असं सूचक वक्तव्य आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
पेट्रोलचे आजचे (४ नोव्हेंबर) दर
-
अहमदनगर – 110.80
अकोला – 109.77
अमरावती – 111.08
औरंगाबाद – 110.69
भंडारा – 110.53
बीड – 111.37
बुलढाणा – 111.51
चंद्रपूर – 110.11
धुळे – 110.46
गडचिरोली – 111.07
गोंदिया – 110.99
बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) – 110.11
हिंगोली – 111.07
जळगाव – 110.34
जालना – 111.51
कोल्हापूर – 109.98
लातूर – 111.33
मुंबई – 109.98
नागपूर – 109.71
नांदेड – 112.41
नंदुरबार – 110.67
नाशिक – 110.71
उस्मानाबाद – 110.24
पालघर – 110.56
परभणी – 113.15
पुणे – 109.53
रायगड – 110.66
रत्नागिरी – 111.52
सांगली – 109.92
सातारा – 110.66
सिंधुदुर्ग – 111.20
सोलापूर – 110.57
ठाणे – 110.04
वर्धा – 110.12
वाशिम – 110.54
यवतमाळ – 111.52
भाजपच्या नेत्यांचं तोंड फुटणार आहे
भाजपच्या नेत्यांचं तोंड फुटणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख सुटतील याची आम्हाला खात्री आहे. परमबीर सिंग यांच्याकडे त्यांनी केलेल्या आऱोपाचे काही पुरावे नाहीत असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं तोंड फुटणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे प्रकरणातही बरेच आरोप झाले त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की जोपर्यंत नवाब मलिक इंटरव्हल करत नाही तोपर्यतं मी काही करणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. त्यावरून नवाब मलिक यांना विचारलं असता त्यांनी मी आणि संजय राऊत हे सलीम जावेदप्रमाणे हा सिनेमा संपवू असं म्हटलं होतं. आज इंटरव्हल नवाब मलिक करतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.