नागपूरमध्ये स्वतःचं सरण रचून वृद्धाची आत्महत्या, मृत्यूच्या आधी पूजा केल्याचंही समोर
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नागपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 1 मार्चला घडली आहे. स्वतःचं सरण रचून आत्महत्या करण्यापूर्वी आत्माराम यांनी विधिवत पूजा […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नागपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 1 मार्चला घडली आहे.
स्वतःचं सरण रचून आत्महत्या करण्यापूर्वी आत्माराम यांनी विधिवत पूजा अर्चा केली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी दि.१ मार्चला किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते तसेच ते नेहमी आजारी असायचे. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चांगली झाली होती. असं असूनही त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची चर्चा गावात सुरू आहे.
औरंगाबादमध्ये 29 वर्षीय विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट नाही