Interview Questions: कोणत्या देशात च्युइंगम खाण्यावर आहे बंदी?
Interview Tricky Questions: सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतीचा राऊंड पूर्ण करणे हे सर्वात कठीण काम समजलं जातं. कारण सरकारी भरतीच्या मुलाखतीत ज्ञानाबरोबरच मनाचीही चाचणी घेतली जाते. मुलाखती अनेकदा सोपे प्रश्न विचारले जातात. पण उमेदवार उत्तरे देताना चुका करतात. असेच काही प्रश्न मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. जाणून घ्या नेमके कोणते प्रश्न विचारले जातात. 1. प्रश्न: […]
ADVERTISEMENT

Interview Tricky Questions: सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतीचा राऊंड पूर्ण करणे हे सर्वात कठीण काम समजलं जातं. कारण सरकारी भरतीच्या मुलाखतीत ज्ञानाबरोबरच मनाचीही चाचणी घेतली जाते. मुलाखती अनेकदा सोपे प्रश्न विचारले जातात. पण उमेदवार उत्तरे देताना चुका करतात. असेच काही प्रश्न मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. जाणून घ्या नेमके कोणते प्रश्न विचारले जातात.
1. प्रश्न: कोणत्या देशात च्युइंगमवर बंदी आहे?
उत्तर: सिंगापूर
2. प्रश्न: हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो?
उत्तर: 5 लिटर.
3. प्रश्न: आंबट मध कोणत्या देशात आढळतं?
उत्तर: ब्राझील
4. प्रश्न: 01 वर्षात किती तास असतात?
उत्तर: 8760.
5. प्रश्न: जगात किती धर्म आहेत?
उत्तरः हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत. परंतु जगात 300 पेक्षा जास्त धर्म आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत.
6. प्रश्न: 13व्या- 14व्या शतकात भारतीय शेतकऱ्यांनी कशाची लागवड केली नाही?
उत्तर: मका
7. प्रश्न: सोन्याच्या शुद्धतेची व्याख्या काय आहे?
उत्तर: कॅरेट
असे अनेक वेगवेगळे प्रश्न शासकीय नोकरीसाठीच्या मुलाखतीत विचारले जातात. त्यामुळे आपलं जनरल नॉलेज आणि चालू घडामोडींबाबत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. याच प्रश्नांच्या माध्यमातून आपली बौद्धिक चाचणी घेतली जाते. त्यामुळे जर आपण शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अशा प्रश्नांची नक्की तयारी करुन जा. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.
UPSC : IIT मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमारने सांगितला ‘यूपीएससी’तील यशाचा मंत्र; विशेष मुलाखत
UPSC मुलाखतीत महाराष्ट्रातल्या वारली पेंटिंग साडीबाबतचा प्रश्न
काही महिन्यांपूर्वी गाझियाबादच्या अपाला मिश्रा या तरुणीने यूपीएससी परीक्षेत घवघवीत असं यश मिळविलं होतं. पण या निकालाआधी तिची जी मुलाखत झाली तेव्हा तिला देखील असेच इंटरेस्टिंग प्रश्न विचारण्यात आले होते.
यूपीएससी परीक्षेत अपालाने नववा क्रमांक मिळवला. तसेच मुलाखतीत विक्रमी गुणंही मिळवले. मागील वर्षी मुलाखतीत 212 गुणांचा विक्रम होता. हाच विक्रम अपालाने तोडला आहे. तिने मुलाखतीत यावेळी 215 गुण मिळवले आहेत. अपाला हिची मुलाखत तब्बल 40 मिनिटं सुरु होती. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या पॅनलने अपालाला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले.
मात्र, अपालाला सर्वात इंटरेस्टिंग प्रश्न हा वाटला की, तिने परिधान केलेल्या साडीच्या पदरावरील नक्षीबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला.
‘मला एक प्रश्न खूपच इंटरेस्टिंग वाटला. त्यांनी मला विचारलं की, ‘आपण जी साडी परिधान केली आहे. त्याच्या पदराच्या बॉर्डरवर जी नक्षी आहे त्याला काय म्हणतात?’
‘मी त्यांना सांगितलं की, ही साडीवर असलेली नक्षी म्हणजे वारली पेंटिंग आहे. तर त्यांनी मला विचारलं की, ‘ही चित्रकला नेमकी कुठे आढळते?’ तर मी त्यांना सांगितलं की, ‘महाराष्ट्रात ही चित्रकला आपल्याला पाहायला मिळते ज्याला वारली पेंटिंग असं म्हणतात.’ मला वाटतं की, हा खरोखरच इंटरेस्टिंग प्रश्न होता.
‘मी इंटरव्ह्यू रुममध्ये प्रवेश केल्यानंतर मला पहिलाच प्रश्न असा विचारण्यात आला की, तुमच्या अपाला या नावाचा अर्थ काय आहे?’
‘माझं नाव हे माझ्या आईने ठेवलेलं आहे. जी स्वत: एक हिंदी साहित्याशी निगडीत आहे. अपाला याचा अर्थ ऋग्वेद काळात एक आघाडीची महिला होती. ज्यांनी आपल्या ऋग्वेद रचनांमध्ये खूप बरंच योगदान दिलं आहे. तसंच त्या काळातील त्या एक स्वत: महिला ऋषी देखील होत्या. तसेच अपाला यांनी काही रोगांवर आयुर्वेदिक मात्रा देखील शोधल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावरुनच माझंही नाव अपाला ठेवण्यात आलं आहे.’ याच प्रश्नाने माझ्या मुलाखतीची सुरुवात झाली होती.